Latest Marathi News
Ganesh J GIF

बिग बाॅस ओटीटीमध्ये या अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा

स्पर्धकासोबत केले नको ते कृत्य, युजर्स सलमानवर भडकले, पण अभिनेत्री म्हणते मला अभिमान वाटतो...

मुंबई दि १ (प्रतिनिधी)- टेलीव्हिजन विश्वातील वादग्रस्त कार्यक्रम बिग बाॅस नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा कार्यक्रम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण ठरले आहे ते अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने ओलांडलेल्या मर्यादा. त्यामुळे टिका होत आहे.

सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी २ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या शोमध्ये पहिल्या दिवसापासून वादग्रस्त घडामोडी घडत आहेत. अर्थात वादग्रस्त हेच याशोचे वैशिष्ट्य आहे. पण हा शो फॅमिली शो असल्याचे सलमानने सांगितले होते. पण नेमके याच्या उलट घडताना दिसत आहे. कारण यादीचा एक प्रीमियर व्हायरल झाला आहे यात जैद हदीद-आकांक्षा पुरी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रोमोमध्ये त्या दोघांनी लिपलाॅक सिन दिला आहे. अविनाश सचदेवने जैद आणि आकांक्षा यांना घरात एक चॅलेंज दिले होते त्यानंतर या दोघांनीही ते आव्हान स्वीकारले होते. या चॅलेंजमध्ये दोघांनी घरात लावलेल्या कॅमेऱ्यांसमोर एकमेकांना लिप किस करायचे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर दोघांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे नेटकरी चांगलेच खवळले आहेत. आता यूजर्स सलमान खानवर देखील जोरदार टीका करत आहे. चाहते देखील आकांक्षा पुरी हिच्यावर नाराज आहेत. टीआरपीसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात अशी टिका केली जात आहे. पण सलमानने आपले वचन तोडले असे देखील युजर्स म्हणत आहेत.

आकांक्षा पुरी हिने मात्र आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर करण्यात आली असुन त्यात आकांक्षा पुरी हिचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेत्री असो किंवा अभिनेते यांच्यासाठी ही अत्यंत साधी बाब असल्याचे देखील या पोस्टमध्ये म्हटले आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!