Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणारा अटकेत

पोस्टवर टॅग करत अश्लील कमेंट, भाजपाच्या आक्रमतेनंतर गुन्हा दाखल, कमेंट करणारा निघाला...

दि २(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती सीए असुन तो छत्रपती संभाजीनगरमधील आहे. अमृता फडणवीस सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतात. त्याच्या राजकीय ट्विट नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे त्यांना बरेचदा ट्रोल देखील करण्यात येत असते.

बँकेत नोकरी करत असतानाच गायन आणि अन्य कला जोपासणाऱ्या अमृता फडणवीस सोशल मिडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सक्रिय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील लाखांमध्ये आहे. अतिष ओमप्रकाश काबरा असे आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर पेशाने सीए असलेल्या अतिषने आक्षेपार्ह कमेंट केली होती. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत सदर तरुणाला जाब विचारला, तसेच त्याची पोलिसांकडे देखील तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना प्रकार कळवला. सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांना त्यांच्याकडून हा प्रकार कळताच त्यांनी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध सुरू करत लागलीच ताब्यात घेतले. पालोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारीनंतर सोशल मिडीयावरून ती कमेंट हटवण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांना बरेचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. गेल्या काही दिवसांत सायबर पोलीस अधिक सक्षम झाले आहेत. नवनवीन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेरच्या माध्यमातून सोशल मीडियावर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेऊन असतात.

अमृता फडणवीस सोशल मिडियावर कायम सक्रीय असतात. अनेक विषयांवर त्या आपली मते मांडतात. पण ट्रोलिंगचे त्यांनी कायम स्वागत केले आहे. तुम्ही ट्रोल करत रहा, पण मी गाणे गात राहणार आणि आपली मते मांडत राहणार असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. दरम्यान जयसिंघाणी प्रकरणी देखील त्यांना धमकी देण्यात आली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!