Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ शिंदेमुळे नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार?

नरेंद्र मोदी राणेंच्या कामगिरीवर नाराज?, एकनाथ शिंदेच्या साथीमुळे राणेंचे महत्व घटले?, बघा काय घडले

मुंबई दि १(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपाकडून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला आगामी व्यूहरचनेचा भाग म्हणून शिंदे गटाला देखील दोन मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिली जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे हे डच्चू दिले जाणारे नेते महाराष्ट्रातील आहेत.

आगामी लोकसभेपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रीपद मिळत असताना नारायण राणे यांच्या कडून मंत्रीपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. याआधी देखील मोदी राणेंच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे शिंदेची साथ भेटल्यामुळे राणेंचे भाजपातील महत्व कमी झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राणे यांना मंत्रीपद देण्यात आले होते. पण निवडणुका अजूनही जाहीर झाल्यानसून शिंदे भाजपासोबत आल्याने राणेंचे महत्व तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे शिंदे राणे सुप्त संघर्ष होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान राणे यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता असल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार का हे पहावे लागणार आहे.

शिंदे गटातील लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, भावना गवळी यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रीपद कोणाला द्यायचे याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!