Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीचा आर्यन खानवर आहे क्रश, चाहते हैराण

आर्यन खानचे भरभरून काैतुक, म्हणाली तो खूपच चांगला आणि शहाणा...

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची पोलखोल केली आहे.


पलक एका ठिकाणी मुलाखत देत असताना तिला आर्यन खानबद्दल विचारले असता ती म्हणाली, पलक आणि आर्यन एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. आतापर्यंत अनेकदा त्यांना एकत्र पार्ट्यांमध्येही पाहण्यात आलं आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानबद्दल बोलताना ती म्हणाली, “तो जसा दिसतो तसाच आहे. तो खूप कमी बोलतो पण जे बोलतो ते अगदी मुद्देसूद आणि प्रभावी बोलतो. तो खूप चांगला आणि शहाणा मुलगा आहे. कोणत्याही पार्टीत तो एकटा दिसतो. जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो देखील तुमच्याशी हसत हसत संवाद साधेल. पण त्याव्यतिरिक्त जास्त करून तो शांतच असतो.” तिच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे कारण चित्रपटामुळेच नाही तर पलक ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत पलक तिवारी हिचे नाव जोडले जात आहे. इतकेच नाहीतर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पण आता तिने आर्यमबरोबर बोलत असताना इब्राहिमचा पत्ता कट केला आहे, त्याचबरोबर मी आणि इब्राहिम अली खान खूप जास्त मित्र नाहीत, जेवढे लोकांना वाटते तेवढे तर नक्कीच नाहीत. आम्ही नेहमीच कार्यक्रमांमध्ये भेटतो आणि तिथेच जास्त गप्पा मारतो. आम्ही एकमेकांना बोलतो हे खरे आहे पण आम्ही जास्त क्लोज नक्कीच नाहीत असे म्हणत अफेअरच्या चर्चांना पूर्ण विराम लावला आहे. पलकने आधी तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

 

सलमान खान आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘किसी का भाई किसी की जान हा चित्रपट’ २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. तर अभिनेत्री पलक तिवारी देखील या चित्रपटात हटके भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या फोटोशुटची देखील जोरदार चर्चा होत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!