Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग संघावर येणार बंदी?

आयपीएलमधील गैरव्यवहारामुळे याआधीही चेन्नईवर बंदी, काय आहे प्रकरण

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- आयपीएलचा यंदाचा हंगाम रंगात आला आहे. यावेळी चेन्नई संघ देखील फॉर्मात आहे. मुंबई इंडियन्स नंतर सर्वात लोकप्रिय संघ म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगची चर्चा असताना दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जवर बंदीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

तमिळनाडूतील पीएमके पक्षाचे आमदार एसपी वेंकटेश्वरन यांनी तामिळनाडू सरकारकडे तामिळनाडू विधानसभेत बंदीची मागणी केली आहे. ते म्हणाले तामिळनाडूमध्ये अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. पण सीएसकेच्या फ्रँचाइजीने आपल्या २७ सदस्यांच्या संघात एकही तामिळनाडूचा खेळाडू घेतलेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘अनेक तरुण मोठ्या आवडीने आयपीएल पाहत आहेत. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. आमचे नेते डॉ. रामदास यांनी ‘इन सर्च ऑफ तमिळ’ ही मोहीम तरुणांमध्ये तमिळ भाषेच्या रक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरू केली आहे. बर्‍याच लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आहे आणि सांगितले आहे की चेन्नई त्यांच्या संघाच्या नावाचा भाग असूनही ते आमच्या प्रतिभावान देशी खेळाडूंना संधी देत ​​नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्याची गरज आहे. मी आज विधानसभेत लोकांच्या भावना मांडल्या. ते तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व करत असल्याने ते आमच्या लोकांकडून नफा कमावत आहेत पण तामिळनाडूचे खेळाडू तेथे नाहीत. आमच्या राज्यातील अधिकाधिक लोकांनी सीएसके संघाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे.” असे वक्तव्य व्यंकटेश्वरन यांनी केली आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जवर यापूर्वी २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आयपीएल मधील गैरव्यवहारामुळे ही बंदी घालण्यात आली होती.

दुसरीकडे एआयएडीएमकेचे आमदार आणि माजी मंत्री एस. पी. वेलूमणी यांनी चेन्नईत आयपीएलचे सामने पाहण्यासाठी सर्व आमदारांना मोफत पास देण्याची मागणी केली आहे.त्याला उत्तर देताना तामिळनाडूचे क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नईत आयपीएल सामने पाहण्यासाठी मोफत पास मागणाऱ्या एआयएडीएमके आमदाराला थेट बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!