आदित्य राॅय कपूरला ही अभिनेत्री करतेय डेट
सोशल मिडीयावर चर्चेला उधान, केमिस्ट्रीची चर्चा, अभिनेत्रीची आई म्हणाली...
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या कानावर पडत आहेत. अलीकडेच सिद्धार्थ – कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. तसेच त्यांचे फोटोशुट देखील चर्चेत आले आहे.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटींगबद्दल अनेकदा चर्चा होते. अलीकडेच दोघांच्या रॅम्प वॉकने अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरबद्दल हिंट दिली होती माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत मी अनन्या आणि आदित्य यांच्यातील उत्तम केमिस्ट्री पाहिली, असं करणनं सांगितलं होते. अनन्या कपूर आणि आदित्य रॉय कपूर खरंच रिलेशनशीपमध्ये आहेत का? खरंच ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का? यावर अनन्याची आई आणि चंकी पांडेची बायको भावना पांडे हिने भाष्य केलं आहे. “खरी गोष्ट सांगायची झाली तर अनन्या सध्या सिंगलच आहे. इंडस्ट्रीमध्ये या सर्व गोष्टी होतात. लिंक-अपच्या चर्चा सुरू असतात. अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांच्या लाईफचा हा एक भाग आहे. त्यामुळेच इंडस्ट्रीच्या चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. त्यांना प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहता या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो. कारण सकारात्मक विचार नेहमीच नकारात्मक विचारांवर भारी पडतात.” त्यामुळे सध्या तरी दोघे रिलेशनमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान
काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेचे नाव शाहरूख खानचा लेक आर्यन खानसोबत देखील जोडले जात होते.
अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती सध्या ‘ड्रीम गर्ल २’ आणि ‘खो गये हम कहाँ’ मध्ये काम करत आहे. त्याचवेळी तीचा आदित्य रॉय कपूर सोबतचा ‘गुमराह’ चित्रपट येत आहे.