Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसचा हा नेता बनणार राज्याचा विरोधी पक्षनेता?

राष्ट्रवादी फुटीनंतर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची लाॅटरी, नाना पटोलेंचा प्रभाव रोखणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये देखील फुट पाडली जाईल, अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात केली जात होती. पण काँग्रेस नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. संख्याबळानुसार हे पद काँग्रेसला मिळणार आहे.

राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत असताना आता राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. तर काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे. वडेट्टीवार यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी आनंदाची बातमी, आपले लाडके नेते, ओबीसींचे कैवारी, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार माननीय विजय वडेट्टीवार यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता! ही पोस्ट केली आहे. त्यामुळे याविषयी चर्चा सुरु झाली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेता पदावर बसवल्यास काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यास मदत होणार आहे.

राज्यातील संघटनात्मक बदलाचे देखील संकेत मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या नवीन नावाबाबत देखील चर्चा होणार असल्याचे समजते. येणाऱ्या महापालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पक्षाला डोकेदुखी होऊ शकते. दरम्यान नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षातील एक गट सातत्याने करत आहे. त्यांच्यापैकी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आदी विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत, त्यांचा मनमानी कारभार योग्य नाही, अशी तक्रार केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!