Latest Marathi News
Ganesh J GIF

भारताची क्रश असणारी ही अभिनेत्री लवकरच करणार लग्न?

अभिनेत्रीचा भावी पतीसोबतचा तो व्हिडिओ व्हायरल? होणारा पती आहे सुपरस्टार अभिनेता, पहा व्हिडिओ

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- भारताची क्रश आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या विशेष चर्चेत आहे. पण आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रश्मिका सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडाबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

रश्मिका आणि विजय यांच्या गेल्या काही दिवसांपासून अफेअरच्या चर्चा होत होत्या. पण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात विजय आणि रश्मिका लंच डेटला गेलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळीदेखील उपस्थित आहेत. त्यामुळे ते सगळे रश्मिका आणि विजयच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तर एकत्र आलेले नाहीत ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  पण त्या व्हिडिओनंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेही रश्मिका आणि विजयच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. विजय आणि रश्मिकाचे ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉमरेड’ हे चित्रपट तुफान हिट ठरले. या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र त्यांनी अद्याप उघडपणे प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण त्याचा इन्कार देखील केलेला नाही. रश्मिका आणि विजय या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधी त्यांनी त्यांच्या एका व्हिडीओ आणि कमेंटवरुनही याच चर्चा सुरु झाल्या होत्या. रश्मिकाने तिच्या वाढदिवसाला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉर्ट आणि विजयचा एक फोटो एका नेटकऱ्याने जोडून ट्विटरवर ट्वीट केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिले की, ‘विजय आणि रश्मिका हे एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे एकाच घरात राहात आहेत.’ नेटकऱ्याच्या या पोस्टला रश्मिकाने रिप्लाय दिला होता की,’अय्यो… जास्त विचार नको करू बाबू’. रश्मिकाच्या या रिप्लायनं सर्वांच लक्ष वेधले होते.

रश्मिका सध्या रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ‘पुष्पा 2’ आणि वेंकी कुदुमुला हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. तर विजय ‘कुशी’ या चित्रपटात दिसणार आहे. सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!