Latest Marathi News

या अभिनेत्रीच्या वाढदिवसाला तिचा प्रियकर करणार धमाका

अभिनेत्रीला पाठवलेले पत्र तुफान व्हायरल, पत्र पाठवत म्हणाला तू आयुष्यात आल्याने...

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याबद्दल विविध खुलासे होताना दिसत आहे. या प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात साक्ष दिली होती. पण आता त्याने एका अभिनेत्रीला पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे.


अभिनेत्री जॅकलीनचा वाढदिवस जवळ आला आहे. सुकेशने या पत्रात जॅकलीनला एक सुपर सरप्राईज देण्याबाबतही सांगितले आहे आणि हे सरप्राईज पाहिल्यानंतर तिला खूप आनंदही होईल असेही त्याचे म्हणणे आहे. सुकेश आपल्या पत्राची सुरुवात सुरुवात माय लव्ह, माय बेबी जॅकलीनने केली आहे. सुकेशने पुढे लिहिले आहे की, त्याने जॅकलीनला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पाहिले होते, तिचा अभिनय, तिचा डान्स हे सर्व खूप क्लासी, एलिगंट, सुपर हॉट होते. त्यामुळे तो पुन्हा जॅकलीनच्या प्रेमात पडला. सुकेशने असेही लिहिले की, ‘त्याच्या आयुष्यात लेडी लव्ह आल्याने तो खूप आनंदी आहे आणि तिची ताे नियमित आठवणही काढताे.’ सुकेशने पुढे सांगितले की, ‘त्याला फक्त जॅकलीनला आनंदी ठेवायचे आहे.’ माझी राणी, तू माझ्या आयुष्यात आहेस त्यामुळे मी धन्य आहे. बोटा बोम्मा, मी तुला माझे सर्वस्व मानतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्रत्येक सेकंदाला मी तुझ्याबद्दल विचार करतो, तुला माहित आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. सुकेशचा वकील अनंत मलिक यांच्यामार्फत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रात सुकेशने जॅकलिनवरचे त्याचे प्रेम आणि तो तिला किती मिस करत आहे हे व्यक्त केले आहे. दरम्यान सुकेशने सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

सुकेशने जॅकलीनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता आणि ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलीन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!