Latest Marathi News
Ganesh J GIF

बारसूत उद्धव ठाकरे – नारायण राणे आमने-सामने

राजकीय संघर्ष पेटणार, ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली, उद्या राजकीय राडा?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्या बारसुत जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६ मे ला बारसुचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत. पण याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील बारसूत जाणार आहेत,त्यामुळं एकाच दिवशी हे ऐकमेकांचे पक्के वैरी उद्या बारसूत भिडणार आहेत. त्यामुळं उद्या पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटणार असून, राणे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहयला मिळणार आहे. बारसूवरुन राणेंनी उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. मुख्यमंत्री असताना यांनीच या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. तसे पत्र देखील लिहिले होते. मात्र आता फक्त विरोधाला म्हणून विरोध करताहेत. असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. याचा समाचार उद्धव ठाकरे घेणार का, हे पाहवे लागेल. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहेत.

राजापुरातील विविध ५१ संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी, जमीनदार प्रकल्पासाठी जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!