Latest Marathi News

…म्हणुन वकीलाच्या बायकोने बस कंडक्टरला केली मारहाण

एसटी बसमध्ये वकिलाच्या बायकोचा राडा, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

बुलढाणा दि २७(प्रतिनिधी)-घराजवळ बस का थांबवली नाही? या कारणास्तव एका महिलेने बसमध्येच कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद – छत्रपती संभाजीनगर बसमध्ये ही घटना घडली. समद तडवी असं मारहाण झालेल्या बस कंडक्टरचं नाव आहे. समद तडवी असं मारहाण झालेल्या बस कंडक्टरचं नाव आहे. एका प्रतिष्ठित वकीलाची पत्नी एसटी बसने प्रवास करत असताना कंडाक्टरने तिच्या घराजवळ बस थांबवली नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलेने कंडाक्टरला बसमध्येच मारहाण केली. यानंतर बस कंडक्टर समद तडवी यांच्या तक्रारीनूसार देऊळगावराजा पोलिसांनी महिलेवर गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा अधिक तपास पाेलिस करीत आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर
व्हायरल हाेत आहे. अनेकांनी या मारहणीबद्दल संताप व्यक्त केला करत कारवाईची मागणी केली आहे.

 

बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात वाद होण्याच्या घटना ब-याचदा पहायला मिळतात. पण अलीकडे प्रकरणे थेट मारहाणीवर आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. मध्यंतरी एका महिला प्रवासी आणि महिला कंडक्टर यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला होता. आता वकील महिलेच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!