Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडची ही अभिनेत्री पडली या खासदाराच्या प्रेमात?

डिनरचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल, फोटोज पाहून नेटकऱ्यांच्या चर्चेला उधान

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि राजकारण यांचा खुप जवळचा संबंध राहिलेला आहे. अनेक अभिनेते पुढे जाऊन नेते बनले आहेत तर अभिनेत्रीही खासदार आमदार झालेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जोड्या देखील तयार झाल्या आहेत. आता देखील एक बाॅलीवूड तारका एका खासदाराबरोबर रिलेशनशीप मध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासोबतचे परिणीती रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावले जात आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा डिनरवर स्पॉट झाले होते. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओंवर कमेंट करताना चाहते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा करत आहेत. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटबाहेरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा सलग दोन दिवस एकत्र दिसले, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. पण, ते दोघेही चांगले मित्र आहेत. ते दोघे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत. त्यामुळे ती फक्त मैत्रीची भेट होती की मैत्री प्रेमात बदलली आहे. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबाबत राघव चड्ढा यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, तुम्ही मला परिणीतीवर नाही तर राजकारणावर प्रश्न विचारा. परिणीतीचे प्रश्न विचारू नका. तर काहीजण परिणीती चोप्रा राजकारणात येण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. दोघांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांच्या संपर्कात असावेत, असा लोकांचा समज आहे. मात्र, या प्रकरणी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

परिणीती चोप्राच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तिच्याकडे आगामी काळात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.ती इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चित्रपटात दिसणार आहे. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली होती. परिणीती चोप्रा शेवटची ‘उंचाई’ या चित्रपटात दिसली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!