
अखेर या अभिनेत्रीने दिली त्या अभिनेत्यावरच्या प्रेमाची कबुली
प्रेमाची कबुली देताना अभिनेत्री म्हणाली, असा माणूस माझ्या आयुष्यात हवा आहे, तो माझ्या आनंदाचा...
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने साऊथ आणि बाॅलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तम्मना भाटिया आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे लाइमलाइटमध्ये आहे. तमन्ना आणि विजय वर्मा हे दोघेही बऱ्याचदा एकत्र वेळ घालवताना दिसतात, कार्यक्रमांना हजेरीही लावतात. पण आता अभिनेत्रीने स्वतः या नात्यावर पहिल्यांदा भाष्य केले आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. अनेकवेळा ते एकत्र स्पॉट झाले आहेत. तमन्नाने नुकत्याच एका मुलाखतीत रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली,”मला नाही वाटत की तो तुमचा सहकलाकार आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता. आजवर मी अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. जर एखाद्याला कोणासाठी काही वाटत असेल, तर ते नक्कीच अधिक वैयक्तिक आहे. पण विजय वर्माचा प्रश्न विचारताच ती म्हणाली तो ज्या प्रकारचा माणूस आहे, असा माणूस मला खरोखर माझ्या आयुष्यात हवा आहे. तो एक असा व्यक्ती आहे, ज्याच्याशी माझा खूप चांगला संबंध आहे. जेव्हा तुम्ही जोडीदाराच्या शोधात असता, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीनुसार स्वतःमध्ये बरेच काही बदल करावे लागते. पण मी स्वत:साठी एक जग तयार केले आहे आणि इथे अशी एक व्यक्ती आहे, जी माझ्यात काहीही बदल न करता माझे जग समजून घेते. तो एका असा व्यक्ती आहे, ज्याची मला खूप काळजी आहे आणि हो तो माझ्या आनंदाचा स्रोत आहे. विजय वर्मासोबतच्या नात्यावर तिने शिक्कामोर्तब केल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.
तमन्नाचा जन्म २१ डिसेंबर १९८९ रोजी मुंबईत झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तमन्नाने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. “चांद सा रोशन चेहरा” या हिंदी चित्रपटातून तिच्या अभिनयात पदार्पण केले, परंतु २००७ मध्ये आलेल्या “हॅपी डेज” या तेलगू चित्रपटातून तिला ओळख मिळाली. त्यानंतर तिने “बाहुबली: द बिगिनिंग,” “बाहुबली: द कन्क्लूजन,” “१००% लव्ह,” “अयान,” “पैया” आणि “सुरा” सारख्या अनेक यशस्वी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासह – तमिळ इतर अनेक पुरस्कारांसाठीही नामांकन मिळाले आहे.