बाॅलीवूडच्या या सुंदरीला करायचे आहे या अभिनेत्याशी लग्न
ट्विटरवर दोघांचे बाँडिंग ट्रेडिंगवर, त्या व्हिडीओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
मुंबई – बाॅलीवूडची परमसुंदरी क्रिती सेनाॅन आणि टाॅलीवूडचा बाहुबली प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटापासून यांच्यातील जवळीक वाढली असून ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.पण आता क्रितीच्या एका वाक्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या नात्याकडे वेधलं गेलं आहे. तसेच उत्सुकताही वाढली आहे.
क्रितीच्या ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीची एक छोटीशी क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने तिचा ‘आदिपुरुष’मधील सहकलाकर प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिती म्हणाली की, “जर मला संधी मिळाली तर मी प्रभासशी लग्न करेन.” त्यासोबतच ‘आदिपुरुष’च्या शूटिंगच्या वेळी प्रभास क्रितीचा तेलुगूचा शिक्षक बनला होता असंही क्रितीने सांगितलं. आता क्रितीच्या या वाक्याने सर्वजण आवाक् झाले असून तिचं हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपट टिझरमुळे वादात असला तरी या चित्रपटाकडुन दोघांनाही खुप अपेक्षा आहेत. पण सध्या दोघांच्या डेटिंगची चर्चा जोरात सुरु आहे.

#KritiSanon about #Prabhas 💥pic.twitter.com/gnF8QuYa7u
— Troll PRABHAS Haters ™ (@TPHOffl) November 19, 2022
प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात या दोघांव्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा ओम राऊत याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ जून २०१३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.पण सध्या प्रभास आणि क्रिती सेनन ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.