Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

पडद्यामागे मोठ्या हालचाली, गुवाहाटीतील त्या पाळतीमुळे शिंदे गट नाराज

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दाै-यात भाजपाचे दोन शिलेदार पाळतीवर असल्याने आणि अलीकडे भाजपा नेत्यांची विधाने एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधूनही एकनाथ शिंदे लवकरच माजी होतील असा टोला लगावला आहे. ‘सामना’तून शिंदेवर निशाना साधताना ‘महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच,’ अशी टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसाममध्ये महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत,’ असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. यावेळी सामनातुन महाराष्ट्रातील देवस्थानाची यादी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे.

शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिंदेना भाजपा एकटे सोडायला तयार नाही. कोणत्याही कार्यक्रमात एकतरी भाजपाचा आमदार किंवा मंत्री त्याठिकाणी उपस्थित असतोच. अगदी आत्ताच्या गुवाहाटी दाै-यात शिंदे गटातील आमदारांची दांडी असताना भाजपाचे दोन नेते शिंदेंच्या पाळतीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवाय आत्ताचे सरकार पूर्ण भाजपाचे सरकार नाही अशी खंत अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे. त्याचबरोबर शिंदे गटातील नाराजीही उघड होऊ लागल्याने शिंदे पायउतार होणार की सर्व अडचणी दुर करणार याची प्रतीक्षा असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!