Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकसंख्या वाढीवर या मुख्यमंत्र्यांचे अश्लील वादग्रस्त विधान

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपा संतप्त, महिला आमदाराला अश्रू अनावर, महिला आयोग कारवाई करणार

पटना दि ८(प्रतिनिधी)- लोकसंख्या वाढीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहेत. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नितीश कुमार चांगलेच अडचणीत आले आहेत. भाजपा मात्र चांगलाच आक्रमक झाला आहे. अखेर नितिश कुमार यांना आपल्या वक्तव्यामुळे माफी मागावी लागली आहे.

बिहारमधील जातींच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात लैंगिक शिक्षणावर वादग्रस्त विधान केले. नितीश कुमार म्हणाले की, “बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल.” असे विधान त्यांनी केले होते. नितीश कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. नितीश यांच्या या वक्तव्यानंतर, आता राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगानेही नितीश कुमार यांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार बोलत असताना मंत्री मात्र हसत होते. नितीश कुमार जेव्हा यासंदर्भात बोलत होते, तेव्हा सभागृहातील सर्वच सदस्य अस्वस्त झाल्याचे दिसून आले. भाजप आमदार निवेदिता सिंह यांना अश्रू अनावर झाले होते. नितीश यांच्याव निशाणा साधताना भाजपने ट्विट केले आहे की, “भारतीय राजकारणात नितीश बाबूंसारखा अश्लील नेता बघितला नसेल. नितीश बाबूंच्या डोक्यात अॅडल्ट “B” Grade चित्रपटांचा किडा शिरला घुसला आहे. सार्वजनिकपणे यांच्या द्विअर्थी संवादावर बंदी घालायला हवी. संगतीचा रंग चढल्यासारखे वाटत आहे.” तर नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नितीश कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.

यासंदर्भात आता नितीश यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. नितीश म्हणाले, ‘मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो.” असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.आता वाद वाढणार की शमणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!