ही प्रसिद्ध अभिनेत्री देतेय कॅन्सरशी लढा, ओळखनेही अवघड
अभिनेत्रीने सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती, टक्कल पडलेला फोटो पाहून चाहते चिंतेत, म्हणाली आयुष्य...
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिने तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर पोस्ट करत धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच अनेकांनी तिच्या हिमतीचे काैतुक केले आहे.
अभिनेत्री डॉली सोही हिने सोशल मिडीयावर पोस्ट करत आपल्याला कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून भावनिक माहिती लिहिली आहे. डॉलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘तुमचे प्रेम आणि प्रार्थनांबद्दल सर्वांचे आभार. अलीकडे आयुष्य एक रोलर कोस्टर झाले आहे, परंतु जर तुमच्यात लढण्याची ताकद असेल तर तुमचा प्रवास सुकर होईल. तुम्ही काय निवडता त्यावर सगळं काही अवलंबून आहे. प्रवासाचा बळी किंवा प्रवासातून जगणं. ६ ते ७ महिन्यांपासून तिला लक्षणं दिसत होती, पण त्या लक्षणांबाबत काहीही माहिती नसल्याने याकडे तिने दुर्लक्ष केलं. ज्यावेळी तिला दुखणं असह्य झालं, त्यावेळी ती तिच्या गायनोकोलॉजिस्टकडे गेली आणि काही टेस्ट केल्या. टेस्टनंतर तिला सर्वायकल अर्थात गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर तिने यावर उपचार घेणे सुरु केले. आता ती ही लढाई लढत आहे. तिची केमोथेरपी चालू आहे. तसेच डॉली सोहीने मुलाखतीत बोलताना तिने आपल्या १४ वर्षांच्या लेकीला अमेलिया हिला आपल्या आजाराबाबत सांगताना किती कठीण होतं याबाबत सांगितले आहे. तसेच ती म्हणाली की, सुरुवातीचा काळ अतिशय कठीण होता. कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नव्हती. पण नंतर हळूहळू स्वत:ला सांभाळलं आणि सर्वांसोबत हे शेअर केलं. आता तिने सर्वाधिक उत्साही आणि अतिश चांगलं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या हिमतीचे काैतुक केले आहे. तसेच लवकर या सामान्य जीवन सुरु होवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉली सोहीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. डॉलीने “देवों के देव महादेव, हिटलर दीदी, कुसुम आणि भाभी” सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.