बाॅलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री रूग्णालयात दाखल
चाहते काळजीत, आगामी प्रोजेक्टचा प्रमोशनवेळी या कारणामुळे आजारी, उपचार सुरु
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- बाॅलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आजारी पडली आहे. गंभीर प्रकृतीच्या समस्येमुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा अदा शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला फूड ऍलर्जी आणि डायरियामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगामी कमांडो मालिकेचे प्रमोशन सुरू असताना ही घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, अदाला रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तिला फूड एलर्जी झाल्यानं तिला डायरियाचा त्रास झाला. तिला पोटात वेदन होऊ लागल्यानं तिला तातडीनं रूग्णालयात नेण्यात आले होते. अभिनेत्री सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. काही चाचण्याही झाल्या आहेत. अदा शर्माचे हेल्थ अपडेट सेलिब्रिटी इंस्टा पेज व्हायरल भयानीवर देण्यात आली आहे. अदाचे चाहते तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अदा शर्माच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टला प्रमोशन दरम्यान अचानक सकाळी तब्येत बिघडली. तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे ती अशक्तही झाली. लगेचच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा या वर्षी आलेला ‘द केरला स्टोरीज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अदा शर्मा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. ती आपले असे अनेक व्हिडीओज हे इन्टाग्रामवर शेअर करताना दिसते. दरम्यान सध्या तिला विकनेस आलेला आहे. त्यामुळे प्रमोशनपासुन ती दुर राहणार आहे.
अदा शर्मा ‘कमांडो’ या वेबसिरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेचा एक दमदार ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये अदा शर्मा अॅक्शन करताना दिसत होती. या मालिकेत ती भावना रेड्डी नावाच्या महिला एजंटची भूमिका साकारत आहे. ही मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यात अदा यांच्यासोबत अमित सियाल, तिग्मांशु धुलिया आणि मुकेश छाबरा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.