
ही प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतः च्या मुलीलाच दिली धमकी?
अभिनेत्रीच्या मुलीचा मुलाखतीत गाैप्यस्फोट, मुलीवर कायम ठेवते वाॅच, म्हणाली तिने अनेकदा मला...
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आपल्या साैंदर्याचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणून श्वेतांबर तिवारी ओळखली जाते. श्वेताची मुलगी पलक तिवारीही अभिनय क्षेत्रात आली आहे. अलीकडेच तिने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पण आता या अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री पलक तिवारीने नुकतेच तिच्या लहानपणाचे काही किस्से सांगितले आहेत. पलकने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत मोठा गाैप्यस्फोट केला आहे. पलकची आई श्वेताने तिला बॉयफ्रेंडसोबत पकडले होते, त्या दरम्यानचा किस्सा तिने मुलाखतीत सांगितला. मुलाखतीत पलक म्हणते, जेव्हा मी शाळेमध्ये होते त्यावेळी मी बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाण्यासाठी आईसोबत खोटे बोलायचे, त्यावेळी तिची आई श्वेता तिवारी जर खोटं बोलले तर, ते लगेचच पकडायची.पलकने खुलासा केला, ‘माझी सर्वात मोठी समस्या ही होती की मी खूप खोटं बोलायची आणि लोक मला पकडायचे. माझी आई म्हणायची तू खोटं का बोलतेस? दोन तासात तुझं खोटं पकडलं जाईल. माझा एक बॉयफ्रेंड होता. ते्वहा मी साधारण १५ किंवा १६ वर्षांचा असेल. मी त्याच्याबरोबर मॉलमध्ये जात होतो आणि मी आईला सांगितले की मी, खेळायला खाली जात आहे. आई म्हणाली ठीक आहे. मग तिला कळले की मी खेळत नसून मॉलमध्ये आहे. तिला खूप राग आला. गंमत म्हणजे माझी आई तेव्हा मला म्हणायची, ‘मी तुला आता गावीच पाठवते, तुझे केसच कापते.’ तिच्या या खुलाशानंतर अनेकजण आवक झाले आहेत. सध्या श्वेता तिवारीची मुलगी पलक सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे. दरम्यान ‘बिग बॉस ४’ ची विजेती आणि प्रसिद्ध टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’ची स्टार श्वेता तिवारीने २०१४ मध्ये रिलीज झालेल्या पाकिस्तानी अॅक्शन रोमान्स फिल्म ‘सुलतनत’मध्ये काम केले होते.
अभिनेत्री श्वेता तिवारी ही ‘स्मॉल स्क्रीन क्वीन’ म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे. श्वेताचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.