Latest Marathi News
Ganesh J GIF

मोबाईल शाॅपीचे शटर उचकटून चोरट्याने केले असे काही…

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, चोरट्याचा अजब प्रताप, पोलीसांसमोर मोठे आव्हान, व्हिडिओ व्हायरल

छ. संभाजीनगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील मुख्य मार्केटपैकी एक असलेल्या कॅनॉट परिसरात अशीच एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरात चोरीचा घटनाक्रम कैद झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेणुका टेलिकॉम या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. रात्री तीनच्या सुमारास ही चोरी करण्यात आली आहे. चोरांनी या दुकानातून तब्बल 3 लाख रुपयांचे मोबाईल, स्मार्ट वॉच, एअर बड् आणि रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून, सदरील दुकान मालक आणि व्यापारी संघटनेनी पोलीस चौकीची मागणी केली आहे.

मागील बऱ्याच दिवसापासून शहरांमध्ये मोटरसायकलचा रिसोन साखळी चोरी आणि आता शटर उचकटून दुकानातील चोरी समोर आल्यामुळे पोलिसांसमोरचे आव्हान वाढले आहे.
सिडको पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतल्या जात आहे. मागील बऱ्याच दिवसापासून शहरांमध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. तोवर आता चोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!