ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच देणार चाहत्यांना गुडन्युज?
पार्टीतील अभिनेत्रीच्या 'त्या' व्हिडिओचीच चर्चा,चाहत्यांची घालमेल वाढली, बघा काय घडल
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- बाॅलिवूडच्या नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कतरिना कैफने २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याची अफवा अनेकदा समोर आली आहे. पण आता कॅटरिना वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी ईदनिमित्त पार्टी दिली होती. या पार्टीत कॅटरिनाने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी कॅटरिनाने अगदी सैल पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. मात्र ती सतत ओढणी सांभाळताना कॅमेऱ्यात कैद झाली. तर अनेक वेळा तिचा हात पोटावर होता. झालं तर मग नेटकऱ्यांना अंदाज बांधायला सुरुवात केली की कॅटरिना गरोदर आहे आणि बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्टीत कतरिना कैफ एकटीच आली होती. पती विकी कौशल तिच्यासोबत नव्हता. यावेळी काही लोक प्रश्न विचारू लागले की विकी कुठे आहे? दोघांचा घटस्फोट होत आहे का? युजरने असंही लिहिलं की, तो एकटाच पार्टीला हजर राहणं हा त्याच्या घटस्फोटाचा इशारा आहे. त्यामुळे सध्या कॅटरिना जिथे जिथे जात आहे तिला प्रेग्नंसीवरुनच प्रश्न विचारले जात आहे. पण कॅटरिना किंवा विकीकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान अनारकली ड्रेसवरील भरगच्च डिझाईन, कानात इअररिग्स, पायात बुट, दुप्पटा, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे.
कॅटरिना शेवटची ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसली होती. कॅटकडे विजय सेतुपतीचा ‘पाइपलाइन’ आणि सलमान खानचा ‘टायगर ३’ चित्रपट आहेत. ‘टायगर ३’ या चित्रपटात कॅटरिना झोयाची भूमिका साकारणार आहे.