Latest Marathi News

बाॅलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीवर फेकली चप्पल

लोकप्रिय कपलमध्ये या कारणामुळे कडाक्याचे भांडण, तो व्हिडिओ जोरदार व्हायरल, बघा नेमके काय घडले?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- पती पत्नीचे नाते जगातील सुंदर नाते समजले जाते. पण आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार होतात. असाच काहीसा प्रकार बिग बाॅसमध्ये घडला आहे. बिग बॉसचा सतरावा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा शो सुरु होताच राडे होण्यास सुरुवात झाली आहे. १७ स्पर्धकांमध्ये भांडणाचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून उत्सुकता वाढली आहे.

बिग बाॅसचा एक प्रोमो समोर आला आहे. इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील भांडणाने वादाचा श्रीगणेशा झाला.पण या सिझनमधील महागडी स्पर्धक असलेल्या अंकिता लोखडेंने आपला पती विकी जैनला चक्क चप्पल फेकून मारली आहे. प्रोमोत दिसत आहे की, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे एकमेकांशी बोलत आहेत. हे दोघे इतर स्पर्धकांबद्दल बोलत होते. त्यानंतर त्यांच्यात वाद होतात. त्यामुळे चक्क अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली. हा सीन असणारा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. महत्वाचे म्हणजे यात दोघांचे मजेशीर संवाद देखील धमाकेदार आहेत. अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७ ‘मधली सर्वात महागडी स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेने आठवड्यासाठी १२ लाख रुपयांचे मानधन घेतले आहे. तसेच अंकिता लोखंडे -अभिषेक कुमार यांच्यात जोरदार भांडण होताना दिसून आले आहे. दोघेजण किचनमध्ये आपापसात भांडताना दिसले. अंकिताचा पती विकी जैन एक उद्योगपती आहे. विकी जैनचं खरं नाव विकास कुमार जैन आहे. ‘महावीर कोल वॉशरीज प्राइवेट लिमिटेड’ या कंपनीचा तो एमडी होता. तसेच महावीर इंस्पायर ग्रुपचा तो को-ओनरदेखील होता. तसेच अंकिता आणि विकी महागडे स्पर्धक आहेत. दरम्यान याआधीही अंकिताला अनेक वेळा बिग बॉसची ऑफर देण्यात आली होती, तरीही तिने हा शो नाकारला होता. आता पती विकी जैन याच्यामुळे अंकिताने शोसाठी होकार दिला आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अंकिता लोकप्रिय झाली आहे. सध्या बिग बाॅसचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. बिग बॉस १७ हा शो दिल, दिमाग आणि दम या विषयावर केंद्रित आहे, आणि याच थीमवर आधारित आहे.

यंदाच्या सिझनमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैन, ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, एक्स कपल इशा मालवीय-अभिषेक कुमार, मुनव्वर फारुखी, सोनिया बंसल, अनुराग डोबाल, मन्नारा चोप्रा, जिग्ना वोरा, सना रईस खान, रिंकू खान, युट्यूबर अरुण श्रीकांत माशेट्टी, फिरोजा खान हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!