या फायरब्रँड खासदार या कारणामुळे वादात, मोठी खळबळ
सोशल मिडीयावर ते फोटो व्हायरल, तर या प्रकरणी महिला खासदारावर गंभीर आरोप, नेमके प्रकरण काय?
दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. या आरोपांची खातरजमा करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करावी, अशी विनंती त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.
महुआ मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात या व्यावसायिकाकडून पैसे आणि भेटवस्तूरूपात लाच घेतल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणात मोइत्रा यांना लोकसभेतून तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुबे म्हणाले की, ‘जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन असते, तेव्हा मोहुआ मोईत्रा आणि सौगता रॉय यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या ‘ब्रिगेड’ला सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची सवय आहे. ते कोणता ना कोणत्या कारणाने प्रत्येकाला सतत शिवीगाळ करतात. तसेच महुआ मोईत्रा यांना दिलेली ‘फायरब्रँड खासदार’ ही पदवी लबाडीशिवाय काही नाही, असेही दुबे म्हणाले आहेत. हे प्रकरण डिसेंबर २००५मधील आहे. मोइत्रा यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. दुबे यांच्याविरोधातील प्रलंबित चौकशी पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी माझ्यावर काहीही कारवाई करावी, ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवावा, असं देखील मोईत्रा म्हणाल्या आहेत. यावेळी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दुसरीकडे मोईत्रा यांचे काही खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत त्या काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यासोबत दिसत आहेत. फोटोत महुआ मोइत्रा काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासोबत पोझ देताना दिसत आहेत. यावर मोईत्रा यांनी पूर्ण फोटो व्हायरल करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. सुरूवातीला त्या परदेशात नोकरी करत होत्या. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण नंतर त्या तृणमुल काँग्रेसच्या स्थापनेपासून ममता बॅनर्जीसोबत आहेत. २०१६ मध्ये त्या आमदार झाल्या होत्या. तर २०१९ साली त्या खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत.