ते जुने ट्विट पाकिस्तानी अँकरला पडले महागात झाली हकालपट्टी
नऊ वर्षापूर्वी केलेले ट्विट पडले महागात, हकालपट्टी नंतर मागितली माफी, कोण आहे अँकर, प्रकरण काय?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याप्रमाणे देशात उत्साहाचे वातावरण आहे. पण याच दरम्यान एक पाकिस्तानी अँकर अचानक भारतातून मायदेशी परतली आहे. कारण तिने पाकिस्तानात असताना केलेली एक चूक तिला चांगलीच महागात पडली आहे. दरम्यान त्या अँकरने आता भारताची माफी मागितली आहे. पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बास वर्ल्ड कप २०२३ च्या निमित्ताने भारतात आली होती.
झैनबने सोशल मीडियावर पूर्वी भारत आणि हिंदू धर्मावर वादग्रस्त ट्विट केले होते, यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झैनबला प्रझेंटर आणि अँकरच्या यादीतून काढून टाकले आहे. हिंदू धर्म आणि भारताविरोधात तिने यापूर्वी अपमानास्पद ट्विट (आत्ताचे एक्सश्र) केले होते. यानंतर ती भारतात आल्यानंत हे ट्विट पुन्हा एकदा व्हायरल व्हायला सुरुवात झाली. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हिंदू आणि भारताबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल झैनबविरुद्ध सायबर तक्रार दाखल करण्यात आली होती. विनीत जिंदाल नावाच्या वकिलाने झैनबविरुद्ध ही तक्रार दाखल केली होती. विनीत जिंदल यांनी झैनब अब्बासने ९ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेऊन तक्रार दाखल केली. हे ट्विट Zainablovesrk या नावाने करण्यात आले होते. या अकाऊंटचं नाव आता बदलून ZAbbas Official असं करण्यात आलं आहे. तिच्यावर केलेली ही कारवाई पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. पण आता तिने यावर माफी मागितली आहे. जैनब अब्बासने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, माझ्या या प्रवासात सर्वांसोबतचं बोलणं चांगलं होतं. सर्वांनी आपलेपणा दाखवला हे अपेक्षेप्रमाणेच होतं. मला भारतातून जायला सांगितलं नाही किंवा घालवलंसुद्धा नाही. मात्र सोशल मीडियावर ज्या रिएक्शन येत होत्या त्यामुळे मला भीती वाटत होती. माझ्या सुरक्षेला कोणताच धोका नव्हता. पण माझे कुटुंब आणि दोन्ही बाजूचे मित्र चिंतेत होते. त्यासाठी मी निघून गेले. ज्यांना कोणाला माझ्या पोस्टमुळे त्रास झाला त्यांची दिलगिरी व्यक्त करते. असे म्हणत तिने माफी मागितली आहे.
झैनाब अब्बास ही पाकिस्तानी टेलिव्हिजन होस्ट आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. झैनबचा जन्म लाहोरमध्ये झाला आणि तिने इंग्लंडमधील विद्यापीठांतून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तिचे वडील नासिर अब्बास आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि रमीझ राजा हे क्लासमेट्स होते. तर आई अंदलीब अब्बास या इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या ज्येष्ठ सदस्या आहेत.