Latest Marathi News

हा हाॅलीवुडचा स्टार अभिनेता पडला या भारतीय मुलीच्या प्रेमात?

पंजाबी माॅडेलचा हाॅलीवूडमध्ये जलवा, दोघेही एकत्रच झाले स्पाॅट, चर्चांना उधान, दोघांच्या वयात आहे...

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी हाॅलीवूडच्या अभिनेत्यांचे काैतुक करताना किंवा आपण त्यांच्यावर प्रेम करत असल्याची कबुली दिल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. पण आता पहिल्यांदाच कोणता तरी बाॅलीवूड अभिनेता एका भारतीय अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. हाॅलिवडूचा सुपरस्टार टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियो भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिलला डेट करत असल्याची माहिती समोर आहे.


लिओनार्डो डी कॅप्रियोचे डेटिंग लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आहे. ४८ वर्षीय अभिनेता चक्क २८ वर्षीय भारतीय वंशाच्या मॉडेल नीलम गिलला डेट करत आहे. या दोघांमध्ये तब्बल २० वर्षांचे अंतर आहे. कॅप्रियो ३० मे रोजी लंडनमधील चिल्टर्न फायर हाऊसमध्ये नीलम गिलसोबत दिसला होता. तेंव्हापासून दोघे डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वीच लियानोर्डो आणि नीलम गिल ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’मध्ये एकत्र दिसले होते. लिओनार्डा हा सध्या अविवाहित आहे. ते एकत्र दिसल्यानंतर ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण ते दोघं एकमेकांना डेट करत नसून एका काॅमन मित्रामुळे त्यांची भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर काहीजणांनी ते दोघं लवकरच आपल्या रिलेशनशिपची ऑफिशियल अनाऊंन्समेंट करणार असल्याची माहिती दिली आहे. पण अद्याप दोघांनीही यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान नीलम गिल तिच्या YouTube चॅनेलवर गुंडगिरी, नैराश्य आणि आत्मविश्वासासोबत संघर्ष यासारख्या विषयांवर बोलताना दिसते. आता या दोघांच्या सेटच्या फक्त अफवा आहेत की ते खरेच डेट करत आहेत. याचा लवकरच खुलासा होणार आहे. दरम्यान मेच्या सुरूवातीला गिल हदीदला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

नीलम गिलचा जन्म १९९५ मध्ये लंडनमध्ये झाला. तिच्या पालकांचा जन्म यूकेमध्ये झाला होता, परंतु तिचे आजी-आजोबा पंजाबमधील होते. नीलमने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिने मोठा नावलौकिक केला. एका दशकापूर्वी, नीलम बर्बेरी मोहिमेत सहभागी होणारी पहिली भारतीय मॉडेल बनली. तिने वोगसारख्या प्रतिष्ठित फॅशन मॅगझिनच्या कव्हरवरही जागा मिळवली आहे. नीलमनीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!