Latest Marathi News
Ganesh J GIF

कोयत्याने सपासप वार करून सूरज काळभोरचा खून, परिसरात प्रचंड खळबळ

सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने पतीचा निर्घृणपणे खून केला. पतीला घेऊन माहेरी आलेल्या विवाहितेने त्याला शेतात फिरायला नेले. तिथे झालेल्या किरकोळ वादानंतर तो बेसावध असताना तिने पतिवर चाकूने वार करत त्याचा खून केला.सुरज राजेंद्र काळभोर (वय 28, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. अंकिता सुरज काळभोर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथील संतोष बोडके यांची मुलगी अंकिता हिच्याशी सुरज काळभोर यांचा मागील सव्वा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सुरज काळभोर सासरी आले होते. रविवारी सकाळी अंकिताने सुरजला शिरगाव येथे प्रति शिर्डी मंदिरात दर्शनासाठी नेले. तेथून आल्यानंतर तिने सूरजला शेतात फिरायला नेले. तिथे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर सुरज बेसावध असताना अंकिताने त्याच्यावर चाकूने वार करत आणि फावड्याने मारत त्याचा खून केला.

सुरजचा खून केल्यानंतर अंकिताने अनोळखी तीन ते चार जणांनी येऊन सुरजवर हल्ला केल्याचे सर्वांना सांगितले. मात्र तिचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिची पोलखोल झाली. सुरज सातत्याने तिला त्रास देत असल्याने तिने असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे अंकिताने पोलिसांना सांगितले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत  आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!