Latest Marathi News
Ganesh J GIF

“ही वादळापूर्वीची शांतता, सरकार बदलण्याची वेळ आलीय!”; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी अन् शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

“देशात सध्या मतलबी वारे वाहत आहेत. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जातात, त्यांना वाटतं विरोधक थंड होतील; पण तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ही वादळापूर्वीची शांतता आहे,” अशा आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

“तरुणांना देशद्रोही संबोधलं, जालियनवाला बागेसारखा अत्याचार!”

उद्धव ठाकरे यांनी ‘जेन-जी’ (Gen-Z) पिढीच्या आंदोलनाचा संदर्भ देत केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “गेल्या महिना-दोन महिन्यांत तरुणाईने सरकारला कसं गुडघ्यावर आणलं हे संपूर्ण जगाने पाहिलं. या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. मला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण व्हावी, असा हा अत्याचार होता.” “तरुणांना वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले, त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले. एवढं होऊनही पंतप्रधानांची त्यांच्याशी बोलण्याची तयारी नाही आणि गृहमंत्र्यांची हिंमत नाही. एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन भागणार नाही, आता संपूर्ण सिस्टिम आणि सरकार बदललं पाहिजे.”

“विद्यार्थ्यांना वेळ नाही, पण फुटीर खासदारांना भेटायला वेळ!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच शिवसेना शिंदे गटातील बंडखोर खासदारांची भेट घेतली. या भेटीवर उद्धव ठाकरेंनी तीव्र शब्दांत टीका केली. “देशातील आंदोलक विद्यार्थ्यांना आणि तरुणांना भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही; पण पक्षातून फुटीर झालेल्या खासदारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी स्वतंत्र संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे.”
– उद्धव ठाकरे

न्यायालयातील खटल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन सुनावणीवर बोलताना ठाकरे म्हणाले. “हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी आजवर बोललो नाही आणि पुढेही बोलणार नाही. संविधानानुसारच निकाल लागेल याची मला पूर्ण खात्री आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.”

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!