Just another WordPress site

मराठीतील या अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली

इन्स्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता, नादखुळ्या लुकवर सुपरहिट कमेंट

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत येत असतात. नुकतीच इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. हे फोटो पाहुन चाहते बेहाल झाले आहेत.

GIF Advt


प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, मुझे इश्क़ है इश्क़ से . इस दर्द से इश्क़ है । असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान प्राजक्ताच्या फोटोशूट इतकीच तिच्या फोटो कॅप्शनची देखील चर्चा होताना दिसते. तिचं हे नवं फोटोशूट पाहून चाबत्यांनी तर कमेंटचा पाऊसच पाडला आहे. प्राजक्ताने आपल्या प्रेमाची कबुली दिली असली तरी तिचा लुक त्यात महत्वाचा ठरला आहे. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे. सुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. आता तिची पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत एन्ट्री झाली आहे. तब्बल ६ वर्षांनी तिने मालिकेत पुनरागमन केले आहे. पण तिच्या फोटोंनी मात्र चाहत्यांना वेड लावले आहे. तसेच प्राजक्तराज हा तिचा दागिण्यांचाही व्यवसाय आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. दरम्यान प्राजक्ता खरच कुणाच्या प्रेमात पडली का, असा प्रश्ना तिच्या चाहत्यांना पडला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!