Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

या मंत्र्याचे सुचक विधान, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फुटीची शक्यता?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने शिवसेनेने फूट पाडल्यानंतर आता भाजपा शिंदे गटाच्या मदतीने राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी एक सुचक विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवारांनी शिंदे गडावर टिका करताना “मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदे गटातील नाराज आमदार सरकारमधून बाहेर पडतील असे” विधान केले होते. त्याल उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “आमच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अजित पवार चुकीचं बोलत असून उलट राष्ट्रवादी काँग्रेसचेच १० ते १५ आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित अजित पवार शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याचे वक्तव्य करत असतील. शिंदे गटातील आमदार नाराज नाहीत. आपल्याकडील जे काही लोक मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत त्यांना थांबवण्यासाठी केलेली ही वक्तव्य आहेत असा टोलाही सामंत यांनी लगावला आहे.

शिवसेनेतील एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. ज्यानंतर सातत्याने विरोधी पक्षांतील आमदारच शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहेत.त्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नेते एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी येत असल्याने त्या चर्चांना बळकटी मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!