
ठाकरे गटाचे ‘हे’ खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार?
पक्ष, चिन्ह. हातातून जाताच ठाकरेंची सोडणार साथ, बघा काय म्हणाले खासदार
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील आणखी एक खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाची संख्या वाढणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह ठाकरे गटाला दिल्यानंतर नवीन खुलासे समोर येत असून, एका खासदाराने ठाकरेंसोबत राहून शिंदेंच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचं समोर आलं आहे. परभणीचे खासदार. संजय जाधव यांनी शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची चर्चा आहे.निवडणूक आयोगाकडे २४-२५ लाख कागदपत्र दोन्ही गटांकडून जमा करण्यात आली होती. त्यानुसार, अनेक खासदार, आमदार, शाखाप्रमुख, विभागप्रमुख या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केली होती. संजय जाधव गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातून अलिप्त आहेत. गजानन कीर्तिकर शिंदे गटात जाणारे शेवटचे लोकप्रतिनिधी होते. पण आता नाव चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरेंच्या बाजुचे आमदार, खासदार शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे.
परभणीतील ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी शिंदे गटाच्या बाजूने निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू होती. मात्र, स्वत: संजय जाधव यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचा पुरावा दिल्यास खासदारकीचा राजीनामा देईन, असे खुले आव्हानच संजय जाधव यांनी दिले आहे.