‘हे’ बंडखोर आमदार म्हणतायेत ‘उद्धवसाहेब आजही माझ्या मनात’
बंडखोर आमदाराच्या विधानाने शिंदे गटात आॅल इज नाॅट वेल
मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील हे शिंदे यांना जाऊन मिळाले होते. मात्र, शिंदे गटात असूनही माझ्या मनात ठाकरे कायम आहेत अस त्यांनी सांगितल आहे. पाटील एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, असे असतानाही आज सुद्धा त्यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे बॅनर लागलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आमदार किशोर पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी आजही माझ्या मनात ठाकरे कायम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा चर्चेला ऊत आला आहे. किशोर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचे कार्यालय त्यांच्या बहीणीने ताब्यात घेतले होते. यावर पाटील म्हणाले की, “काहींनी शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेऊन त्यावरील माझे फोटो काढून टाकले. त्यांनाही मी शुभेच्छा देतो असं म्हणत उद्धव ठाकरे समर्थक वैशाली सूर्यवंशी या आपल्या बहीणीला टोला लगावला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आजही आमच्या हृदयात आहेत. भविष्यात मला कशा पद्धतीने काम करायचे आहे याचही नियोजन झालं असल्याचं यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे परत शिवसेनेकडे जाण्याचा त्यांचा विचार आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य दिसून येत आहे.
आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे आजही आमच्या मनात कायम असल्याचे सांगितल्याने चर्चांना उधाण आल्याच पाहायला मिळत आहे. आमदार किशोर पाटील यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा मातोश्रीकडे जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.त्यामुळे आगामी काळात अजून काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.