मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?
राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार, त्या विधानामुळे एकत्र येण्याची चर्चा
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी जूनमध्ये ४० आमदारांसोबत शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. इतकेच नाहीतर ठाकरेंच्या हातातून शिवसेना पक्ष देखील गेला. आज ठाकरे आणि शिंदेच्या मधून आजदेखील विस्तव जात नाही. पण भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे लवकरच एकत्र येणार आहेत.

ठाकरे शिंदे वादावर एमआयएमचे नेते असदुद्दी ओवैसी यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे ओवैसी म्हणाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. ओवेसी म्हणाले की, शिवसेनेचे दोन तुकडे झाले तर मला मीडियावाल्यांनी विचारलं की, तुम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटत नाही का? पण शिंदे आणि ठाकरे यांची राम आणि श्यामची जोडी आहेत, हे कधीही एकत्र येऊ शकतात. राहुल गांधी ओरडून सांगतील का, की शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली ! ती कधीपासून झाली असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या जोडाजोडीच्या राजकारणावर टिकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे नेते होऊ शकतात. उद्धव ठाकरे केवळ आपल्या वडिलांच्या पुण्याईवर नेता होऊ शकतात. असे म्हणत त्यांनी पारंपारिक राजकारणावर टिका केली आहे. पण ठाकरे शिंदे एकत्र येण्यावरुन ठोस कारण ओवेसी यांनी सांगितले नसल्यामुळे आणि सध्याचे राजकारण पाहता ती शक्यता फारच धुसर आहे.
यावेळी ओवेसी यांनी भाजपावर जोरदार टिका केली आणि मुस्लिमांना संघटित होण्याचे आवाहन केले. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस नेते होऊ शकतात. मग महाराष्ट्रातील मुस्लिम व्यक्ती शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यासारखे होऊ शकत नाहीत का? असे म्हणत त्यांनी मुस्लीमांना संघटित व्हा, मतदान करा आणि नेते व्हा. जेव्हा तुमची चर्चा होईल, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करु शकाल असे आवाहन केले आहे.