उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
वाहतूक कोंडीत अडकल्यावर मिसेस उपमुख्यमंत्र्यांनी बनवला व्हिडिओ, सोशल मिडीयावर कमेंटचा पाऊस
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या व्हिडीओ मध्ये त्यांनी दिलेल्या कॅप्शन मुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगवर आहे.
अमृता फडणवीस यांनी
वॉट झुमका या गाण्यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील वॉट झुमका या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अनेकांनी याचे रिल्स बनवले होते. अमृता फडणवीस यांनी देखील या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओला ट्रॅफिक जॅम मध्ये करमणूक ,#वॉट झुमका “असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यानी चांगलीच पसंती दिली आहे. नेटकऱ्यानी त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स दिले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर अमृता फडणवीसांनी या वेळात रील बनवून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसून येत आहे. आणि झुमका या गाण्याला साजेसे असे कानातले आभूषणे घातली आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशव मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं असून कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर त्यांच्या विविध लूकमधील फोटो आणि विविध गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्या त्यांच्या गाण्यावरून चर्चेच येतात, तर कधी ते त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे वादाच्या स्थानी असतात. पण सध्या त्यांच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.