Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तुझाही दाभोळकर करु’ म्हणत शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

दोन ट्विस्ट अकाऊंटवरुन पवारांना धमकी, सुप्रिया सुळेंची पोलीसांकडे तक्रार, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी गृहविभागावर जोरदार हल्लाबोल करत टिका केली आहे.

राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट शरद पवारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,’ असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. तर सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्या आजारावरुन टीका केली आहे. त्याविरूद्ध देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीची माहिती देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवारांसाठी मला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला होता. एका वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली होती. पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी माझी मागणी आहे. अशी कृत्ये हे घाणेरडे राजकारण असून ते थांबले पाहिजे. असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच जर शरद पवारांसोबत जर काही बरं-वाईट झालं तर याला फक्त गृह विभाग जबाबदार असेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मागील काही दिवसापासून शरद पवार यांच्यावर राणे पुत्रांकडून देखील जोरदार टिका केली जात आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. शुक्रवारी दक्षिण मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीकडून जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान धमकी प्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!