
होणाऱ्या सासूचे ते रुप पाहून नवी नवरीला बसला शाॅक
व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, पाहुणेही स्तब्ध, एकदा व्हिडिओ बघाच!
पुणे – सध्या लग्नाचा सिझन सुरु आहेत. अनेक लग्न होताना दिसत आहेत. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सासूचा डान्स पाहून नवी नवरीला चांगलाच शाॅक बसला आहे.
नवी नवरी जेंव्हा सासरी जाते तेंव्हा तिला जास्त भीती वाटते ती म्हणजे सासूची सासू आणि सुन हे नाते विविध कारणांनी बदनाम झाले आहे. पण आता काळ बदलत आहेत. आणि सासू आणि सुन हे नाते प्रेमळ आईमुली सारखे असल्याचेही दिसत आहे. सध्या एका लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सासू आणि सून बिनधास्तपणे डान्स करत आहेत. कार्यक्रमात खानदेशी पद्धतीने हालगी वाजत असताना यात अनेकजण हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहे. मात्र या अनेकजणांमध्ये सासू-सुनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. खासकरून सासूचा डान्स पाहून नवरी देखील काही काळ शाॅक झाली होती. सासू-सुनेच्या डान्सला उपस्थित असणाऱ्यांनी जोरदार दाद दिली आहे. या व्हिडीओत सुनेपेक्षा सासूचा डान्समधील उत्साह भाव खावून गेला आहे.
हा व्हिडीओdivya___3128 यांनी इन्स्टाग्राम अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण लाखो नेटकऱ्यांनी पाहिले आहे.