Latest Marathi News
Ganesh J GIF

थरारक! चिडलेल्या वाघाचा थेट पर्यटकांवर हल्ला

वाघाचे जवळून फोटो काढणे आले अंगलट, वाघाच्या हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

नागपूर दि २८(प्रतिनिधी)- जंगल सफारी करताना अनेकजण प्राण्यांचे फोटो कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. पण काहीजण मात्र अनेकवेळा नको ते धाडस करतात, त्यामुळे मोठ्या अडचणीचे प्रसंग घडतात. असाच काहीसा प्रसंग एका पर्यटकांसमोर घडला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पर्यटकांची जिप्सी आपल्या भागात आल्याने एक वाघ चांगलाच आक्रमक झाला होता. त्यामुळे त्याने थेट त्यांच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, आपल्या परिसरात वाहनांची हालचाल पाहून वाघ भडकतो. यानंतर रागाच्या भरात तो गाडीत बसलेल्या पर्यटकांना घाबरवण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. वाघाचे हावभाव पाहून असं दिसतं की तो पर्यटकांच्या इथल्या उपस्थितीने अजिबात खूश नाही. त्यामुळे वाघ अचानक रागाने त्यांच्यावर हल्ला करायला आला. त्यानंतर उघड्या जीपमध्ये बसलेले लोक घाबरून ओरडू लागले. सुदैवाने वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. पण काही जणांचा नको ते धाडस करण्याचा प्रसंग चांगलाच अंगलट आल्याचे दिसून आले आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारोंनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. दरम्यान वाघांची जनगणना नुकतीच जाहीर करण्यात आली असुन देशात ३,१६७ वाघ असल्याचे जाहीर झाली आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी वाघांच्या हक्काचं सरंक्षण व्हायला पाहिजे आणि त्यांना सतत त्रास देणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी थेट जंगल सफारीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवाय जंगल सफारीसाठी जाणाऱ्या लोकांचा वाघांना त्रास होत असल्यामुळे ते लोकांवर हल्ला करत असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!