बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद?
परस्परविरोधी भुमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता? बघा विरोधी भूमिका
रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
बारसू प्रकल्पासाठी स्थानिकांना विश्वासात घ्या. त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. पोलिसी बाळाचा वापर करू नका, असा सल्ला पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दिला आहे. मात्र, ही सबुरीदेखील ठाकरे गटाला मान्य नाही.कोकणातील स्थानिक नागरिकांचा शिंदे फडणवीस सरकारवर विश्वासच नाही. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा आणि विश्वासात घेण्याचा प्रश्नच येत नाही. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया थांबवणे हाच आता एकमेव मार्ग आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाची जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्राला प्रस्तावित केली होती. मात्र ही जागा ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन सरकारने स्थानिकांवर कोणतीही जोर जबरदस्ती केली नाही. केंद्राने पर्यायी जागा तुचविण्यास सांगितल्यानंतर त्याप्रमाणे पर्यायी जागाही त्यांना सुचविण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ राजकारणासाठी दुटप्पी भूमिका घेत आहेत. बारसूतल्या ७० टक्के जनतेचा प्रकल्पाला पाठिंबाच आहे, पण विरोधकांना त्यावरून राजकारण करायचे असल्याने ते स्थानिकांना भडकवत आहेत, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.