Latest Marathi News

टिकटाॅक स्टार तरूणीने दिली आमदाराच्या पुतण्याला धमकी

आमदारावरही केले आरोप, व्हिडिओ अपलोड करत म्हणाली बरेवाईट...

अहमदाबाद दि २३(प्रतिनिधी)- गुजरातमधील टिक टॉक स्टार कीर्ती पटेलला युवकाला मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करत जुनागढमधील जमन भायाणीला मारहाण करण्याची धमकी दिली होती. पोलीसांनी किर्तीसह तिच्या साथीदारांना अटक करत दोन कार देखील जप्त केल्या आहेत.

गुजरातमधील आम आदमी पार्टीचे आमदार भूप भायाणी यांचा पुतण्या जमन भायाणीला मारहाण केली आहे. किर्तीने अगोदर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये जमन भायाणीला धमकी देण्यात आली त्याचबरोबर आपल्यासोबत काही बरेवाईट झाल्यास त्याला आमदार जबाबदार असतील असेही तिने त्या व्हिडिओत सांगितले आहे. गुजरातमधील ही किर्ती पटेल कायमच चर्चेत असते.याआधी एका तरुणीला मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी तिला अटक केली होती. तसेच भरत भरवाड विरोधात गुन्हे दाखल केले होते. कीर्ती पटेलवर अनेकदा मारहाणीचा आरोप करण्यात आले आहेत.

कीर्ती पटेल ही अहमदाबादची रहिवासी आहे. सोशल मीडियावर ती लोकप्रिय असून तिला अनेक जण फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर तिला १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!