Latest Marathi News
Ganesh J GIF

लाडक्या दिराच्या लग्नात वहिनीचा धमाकेदार डान्स

वहिनीचा डान्स पाहुन नववधूही चकीत, वहीनीचा डान्स सोशल मिडीयावर व्हायरल

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आज काल म्हणजे काही महिन्यापूर्वी एक ट्रेण्ड आलेला आहे. तो म्हणजे लग्ना आधी आता एक रिसेप्शन इव्हेंट किंवा हळदी मधेच एक डान्स चा सुंदर म्हणजे एक छानसा छोटासा सुंदर कार्यक्रम लोक करत असतात. तुझा कार्यक्रमामध्ये काहि मुले मुली डान्स करुन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. त्यामध्ये काही महिलाही साडी घालून डान्स करत असतात.अशाच एका दिराच्या लग्नात वहिनीने धमाल डान्स केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका लग्नाच्या निमित्ताने वहिनी तिच्या दिरासमोर डान्स परफॉर्मन्स करत आहे. लग्नाच्या दिवशी वहिनी ‘हम आपके है कौन’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘लो चली में, अपनी देवर की बारात लेके…’ या गाण्यावर वहिनीने मस्त ठेका धरला आहे. तसेच वहिनी असा काही डान्स करत असते की पतीनेही तिच्यासोबत ठेका धरला. यावेळी वहिनीचा डान्स पाहून नववधू देखील थक्क झाली. वहिनीने पतीसोबत स्टेजवर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. यावेळी समोर उपस्थित ढोलताशापथकाने जोरदार ढोल वाजवत साथ दिली. दमदार डान्सचा हस व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर couple_official_page नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

दीर आणि वहिनीचे नाते आई-मुलाच्या नात्याप्रमाणे असते. दिराच्या लग्नात वहिनी सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेते आणि लग्नाच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होते. मात्र या लग्नात वहिनीने धमाल डान्स करत सर्वांना चकित केले तसेच वहीनीच्या डान्सने वातावरण देखील रोमांचित केले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!