Latest Marathi News
Ganesh J GIF

गाडी चालवताना बाईकस्वाराच्या गळ्यात लागला फास

सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल, तरुणाचे पुढे काय झाले

हैद्राबाद दि १६(प्रतिनिधी)- आपण आतापर्यंत अनेक अपघाताचे व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये कधी गाड्यांची एकमेकांना धडक, कधी गाडी डिव्हाइडरला धडकणं, कधी गाडी दरीत कोसळणं असे अनेक व्हिडिओ तुम्ही पहिले असतील.सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, समोरून एक ट्रक येताना दिसत आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने त्याचवेळी एक बाईकस्वार येतो. ट्रकला बांधलेली दोरी सुटते आणि ती खाली लटकते. त्याचवेळी ट्रकमधील सामान रस्त्यावर पडते. यावेळी ट्रकच्या बाजूने एक बाईकस्वार जात असतो. त्यादरम्यान ट्रकला लटकणारी दोरी अचानक बाईकस्वाराच्या गळ्यात अडकते. यानंतर ट्रक पुढे निघून जातो आणि तो बाईकस्वार दोरीसकट मागे खेचला जातो. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हि संपूर्ण घटना कैद झाली आहे.

अपघातात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!