Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील भीषण अपघातात जुळ्या बहिणींचा करुण अंत

अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडीओ व्हायरल, आई वडील जखमी, कुठे झाला अपघात?

पुणे दि १७(प्रतिनिधी)- देशात आणि खासकरून महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समृद्धी महामार्गावर तर अपघात नित्याचीच गोष्ट झाल्यासारखी आहे. दुसरीकडे पुण्यातील नवले पुल तर अपघाताचा ब्लॅक स्पाॅट आहे. पण पुण्यात घडलेल्या एका भीषण अपघातात जुळ्या बहिनींचा करुण अंत झाला आहे. या अपघाताचा अंगावर काटे आणणारा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात हा अपघात घडला आहे. अपघातात साक्षी आणि श्रद्धा सतीशकुमार झा यांचा करूण अंत झाला आहे. तर वडील सतीशकुमार झा आणि आई किरण सतीशकुमार झा हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रमोद रामलाल यादव असे त्या टँकरचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तरप्रदेशमधील झा कुटुंबीय कामानिमित्त पुण्यात भोसरी भागात संत तुकारामनगरमध्ये रहात होते. सर्व झा कुटूंबीय सोमवारी सायंकाळच्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. त्यानंतर दुचाकीवरून चौघे विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर मुलींच्या आईची प्रकृती गंभीर असून, मुलींचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी भावूक झाले होते. यावेळी नागरिकांनी टँकरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीची माहिती घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आजवर रस्ते अपघातात आतापर्यंत हजारो व्यक्तींनी आपला जीव गमावला लागला आहे. यात अनेकदा काहीजण बेदरकपणे वाहन चालवतात. त्यामुळे अनेकांना आपली चूक नसताना देखील जीव गमवावा लागतो. आता विश्रांतवाडी अपघात घटनेने बेशिस्त वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!