Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नाच्या दोन दिवसानंतर नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

घरच्यांच्या विरोधामुळे गळफास घेत प्रेमीयुगलाने संपवले जीवन, कुटुंबियांना धक्का, परिसरात खळबळ

जळगाव दि २६(प्रतिनिधी)- पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलीचे काही दिवसापुर्वीच लग्न झाले होते. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जितेंद्र राजु राठोड आणि साक्षी सोमनाथ भोई असे मयत प्रेमीयुगालाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातील वरखेडी नाका परिसरात जितेंद्र राठोड राहत होता तर त्याच्या घराजवळच्या साक्षी भोई कुटुंबासह राहत होती. त्यामुळे त्यांची ओळख होती. पण नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्यांच्या कुटुंबियांकडून दोघांच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे साक्षीचा दुसरीकडे विवाह ठरवण्यात आला. तिला तो मान्य नव्हता. पण घरच्यांनी जबरदस्ती केल्याने तिने विवाह केला. पण जितेंद्रला ती विसरू शकली नाही. ती माहेरी आल्यानंतर जितेंद्र आणि साक्षी मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटले. या ठिकाणी जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे भावाला जाग आल्यानंतर साक्षी न दिसल्याने शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

साक्षी भोई हिचा नुकताच २३ जून रोजी विवाह झाला आहे. विवाहानंतर ती रविवारी माहेरी आली होती. तर जितेंद्र यंदा १२ वी पास झाला होता. पण घरच्यांनी त्यांचे प्रेम मान्य न केल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!