ठरल तर! रूपाली चाकणकर या मतदारसंघातून लढवणार विधानसभेची निवडणुक
मतदारसंघात तयारी सुरू केल्याचा केला दावा, भाजपा प्रवेशावर म्हणाल्या, त्यांची आणि माझी एकदा भेट.....
पुणे दि २६(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण या लोकसभा मतदारसंघातील दाैंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला गेली तीन टर्म यश मिळवता आलेले नाही. त्यात खडकवासला मतदारसंघात तर सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीने पक्षात घेत तिकिट दिले होते. तरी त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. पण आता एक वर्ष आधीच राष्ट्रवादीने खडकवासलाचा उमेदवार निश्चित केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे महानगरपालिकेतील हिरकणी कक्षाला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीविषयी भाष्य केले आहे. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही भाजपमधून खडकवासला मतदार संघातून लढणार असल्याची चर्चा असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये अनेक पदावर काम केलं आहे. तसेच ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की, मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या, या गोष्टी तुमच्याकडूनच मला समजतात. शरद पवार यांनी सर्व सामान्य कुटुंबातील एका महिलेला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल पवार साहेबाची मी आभारी असून मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. असे सांगत आपण राष्ट्रवादीकडूनच निवडणुक लढवणार” असे स्पष्ट केले. तसेच “खडकवासला मतदार संघात फिरताना मला अनेक समस्या जाणवल्या आहेत. याचे नियोजन करणं गरजेचं आहे. असं रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. दरम्यान रूपाली चाकणकर भाजपाच्या ताब्यातील मतदारसंघ भाजपाचा पराभव करुन जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत याबाबत रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मिसिंग केसेस असतील त्याचबरोबर अँटी ह्यूमन ट्राफिक मध्ये अडकलेल्या केसेस असतील या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आम्ही गृह विभागाला दिलेला आहे. गृहविभागाने त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली.