‘उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे’
शिंदे गटाच्या 'या' मंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना सुचक इशारा
मुंबई दि ३०(प्रतिनिधी) – उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे अन्यथा त्यांची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंनी लगावला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच शिंदे गटाकडून ठाकरेंना जाहीरपणे समेटाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावर राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत.
कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी यावेळी उद्धव ठाकरेंसह चंद्रकांत खैरे यांच्यावर टिका केली आहे. सत्तार म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावे.नाही तर त्यांची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल. खरे तर अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती, असा गाैप्यस्फोट देखील अब्दुल सत्तार यांनी केला. चंद्रकात खैरेंना गणिताची टोटलच कळत नाही, म्हणून चंद्रकांत खैरे हे वेड्यासारखी विधानं करतात असा टोला देखील सत्तार यांनी लगावला आहे. जालन्यात हिंदू गर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होते. त्यावेळी ठाकरेंना समेट घडवून आणा असा इशारा दिला आहे. यावर ठाकरे किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी या अगोदर माफ करण्यासाठी मोठे ह्रदय लागते. असे म्हणत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंकडे टाळीसाठी हात पुढे केला होता. पण ठाकरेंकडून तो उडवून लावला होता. तर उघडपणे समेट घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. आता उद्धव ठाकरे शिंदेचे नेतृत्व मान्य करणार कस? हे पहावे लागणार आहे.