केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची राज्यपालपदी नियुक्ती?
राणेंचे ते वक्तव्य भाजपाच्या जिव्हारी, मंत्रीपदावरुन नारळ देत सक्तीची राजकीय निवृत्ती?
मुंबई दि ६(प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आहे. पण आता भाजपाच नारायण राणे यांचे पंख छाटणार आहे.

नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. पण मागील काही दिवसापूर्वी त्यांचे केंद्रातील मंत्रीपद जाणार असल्याची चर्चा आहे . पण परत एकदा नारायण राणे यांनी भाजपावरच टिका करताना मी भाजपमध्ये आलो हीच अडचण झाली. कारण इथं सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून शांत आहे’, असं वक्तव्य नारायण राणेंनी केल्याने भाजपालाच आरोपी केले गेले. उद्धव ठाकरेंना इशारा देताना त्यांचीच हिट विकेट झाल्यासारखी स्थिती आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत, नारायण राणे यांना मंत्रीपदावरुन नारळ देत राज्यपाल पद देत सक्तीने राजकीय निवृत्ती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, राणे यांची राज्यपाल म्हणून होणारी नियुक्ती महाराष्ट्रात नव्हे, तर इतर कोणत्याही राज्यात होऊ शकते, असी माहिती आहे. त्यामुळे राणे विरूद्ध ठाकरे वाद थांबण्याची शक्यता आहे.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पण भाजपात येऊन अडचण झाली हा शब्दप्रयोग अडचणीचा ठरल्याने नारायण राणे यांच्यावर सक्तीची राजकीय निवृत्ती होण्याची शक्यता वाढली आहे.