Just another WordPress site

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांना अनोखी भेट

 'या' कालावधीत ऎतिकासिक स्मारकांच्या ठिकाणी विनामूल्य प्रवेश

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली.

भारताला १५ स्वातंत्र्य मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. सरकारने औपचारिक सोहळ्याची सुरुवात १२ मार्च २०२१ पासून केली आहे. सरकारी सोहळा १५ ऑगस्ट २०२३च्या संध्याकाळी संपणार आहे. या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती देण्यासाठी केंद्र सरकार वर्षभरापासून देशभर अनेक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने जास्तीत जास्त पर्यटक भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन पुन्हा एकदा देशाचा गाैरवशाली इतिहास जाणून आणि समजून घेतील. नव्या पिढीला इतिहास समजून घेण्याची सुवर्णसंधी लाभेल.असा या मागचा सरकारचा उद्देश आहे.

GIF Advt

केंद्र सरकार १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या माध्यमातून देशभर तिरंगा पोहोचवणार आहे. नागरिकांनी या कालावधीत आपापल्या घराच्या खिडकीत, बाल्कनीत किंवा गच्चीत उंचावर तिरंगा फडवावा असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी सरकारी पातळीवरून २७ कोटी राष्ट्रध्वजांचे घरोघरी वाटप करण्याचे काम सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!