Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमधील बनकर कॉलनीत कोयता गँगचा व्हीडिओ समोर

हातात कोयते घेत परिसरात माजवली दहशत, पोलीसांकडुन कारवाई

पुणे दि १३(प्रतिनिधी)- हडपसर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, काळेपडळ, सातववाडी, गोंधळेनगर, सोलापूर रस्ता, मांजरी-मुंढवा रस्ता, महादेवनगर आदी भागात गेली काही महिन्यांपासून ‘कोयता गँग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांकडून दहशत पसरवली जात आहे. त्या गँगचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की हडपसर आकाशवाणी समोरील सातव प्लॉट-बनकर कॉलनीमध्ये रात्री दोनच्या सुमारास हातात कोयते घेऊन काही तरुण फिरत होते. यावेळी कोयता गँगमधील काहींनी गाड्यांचे नुकसान केले, तर त्यानंतर झाड तोडले, याचवेळी ते एका दुचाकीचालकाच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे. त्याचवेळी या गँगने सीसीटीव्ही कॅमेरा तोडला, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यामुळे आकाशवाणी सातव प्लॉट, बनकर कॉलनीमध्ये सामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली होती म्हणून त्यांनी हडपसर पोलिसांना निवेदन देखील दिले होते त्यानंतर पोलीसांनी तातडीने कारवाई करत काही आरोपींना अटक केली आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास पीएसआय अविनाश शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिवाय गुन्हेचे पोलीस निरिक्षक सगळे, तपास पथकाचे सपोनि विजय शिंदे आणि नाईट आॅफिसर एपीआय सोमनाथ पडसलकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली होती. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे फिरवत कोयता गँगमधील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!