Latest Marathi News
Ganesh J GIF

फुरसुंगी, उरळी देवाची गावे पुणे महानगरपालिकेतून वगळली

राज्य सरकारकडून आदेश जारी, नगरपरिषदेचा मार्ग मोकळा, राजकारणही रंगले

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे. त्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वगळण्याचा निर्णय घेतला. त्या बाबतचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी काढले आहेत. पुणे शहराच्या लगत असलेली ३४ गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागील पाच वर्षाच्या काळात समाविष्ट गावामध्ये राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकाराच्या पायाभूत सुविधा देण्यात देत नाही अशी तक्रार नागरिकांकडुन करण्यात येत होती. त्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता तेथील गावामध्ये आगामी काळात राज्य सरकार मार्फत कशा प्रकारे पायाभूत सुविधा दिल्या जातात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. या आदेशानुसार आता पुणे महानगरपालिकेची सुधारित सीमा १ एप्रिल २०१३ पासून लागू होणार आहे. महापालिकीने फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील रहिवाशांना या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दोन्ही गावांचा विकास प्राधान्याने केला जाईल, असे आश्वासनही दिले आहे.दरम्यान, ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यास शहर सुधारणा समितीमध्ये निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी कचरा डेपोची जागा महापालिकेकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. राजकीयदृष्ट्या विचार केल्यास सत्तांतर झाल्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे याबाबत आग्रही होते. अखेर त्यांची मागणी मान्य करत नगरपरिषदेला मान्यता देण्यात आली आहे.

फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळण्याचा निर्णय राजयकीय असल्याचा आरोप  आमदार संजय जगताप यांनी केला आहे. जगताप म्हणाले, “या निर्णयाला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे या गावातले स्थानिक नेतृत्व आता गावासाठी काम करू शकेल, सुधारणा करू शकेल. मात्र दुसरी बाजू अधिक गंभीर आहे. निर्णय पूर्णपणे राजकीय वाटतो. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी घेतलेला वाटतो. कारण शहरासोबत होणारी या गावांची वाढही खुंटणार आहे. त्यामुळे भरघोस निधीची गरज असल्याचे जगताप म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!