Latest Marathi News
Ganesh J GIF

‘दिल्लीमध्ये आल्यावर मुसेवालासारखे एके 47 ने उडवून टाकू’

खासदार संजय राऊत धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा, धमकीचे पुणे कनेक्शन समोर

मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पण या धमकी प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तसेच एकाला अटक करण्यात आला आहे.

संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली आहे. हा धमकीचा मॅसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. ‘हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर एके 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॉरेन्स के और से मॅसेज है. सलमान और तू फिक्स.तयारी करके रखना.’ असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. तसेच या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्‍लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.  या प्रकरणात पोलिसांनी एका संशयतिला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली. या धमकी प्रकरणात पोलिसांनी राहुल तळेकर (रा. वडगाव शेरी) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राऊत धमकी प्रकरणातील आरोपीचा कुठलाही गॅंगशी संबध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. खबरदारी म्हणून राऊत यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना संशयीताने दारुच्या नशेत धमकी दिल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान संजय राऊत यांनी मला धमकी आली तेव्हा तुम्ही त्याची चेष्टा केली असे म्हणत गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. त्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून संजय राऊत यांच्यावरच आरोप केले आहेत. पण मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयाचा कार्यभार दिला आहे. जे कुणी चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. असे फडणवीस म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!