Latest Marathi News
Ganesh J GIF

राज ठाकरेंचा एक इशारा आणि प्रशासनाची मोठी कारवाई

माहीमच्या समुद्रातील दर्गाचे अनधिकृत बांधकाम हटवले, मंदिराच्या इशा-यानंतर प्रशासन हलले

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने प्रशासनाने माहीम येथील समुद्रातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात या अनाधिकृत बांधकामाचा व्हिडीओ दाखवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात माहीम दर्गा जवळील अनधिकृत दर्गा दाखवला होता. प्रशासनाकडून हे बांधकाम हटवण्यात यावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती. इतकंच नाही तर, महिनाभराच्या आत यावर कारवाई झाली नाही, तर त्याच्यासमोर भव्य गणपती मंदिर उभारू असा, इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. अनाधिकृत बांधकाम पाडत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही परिसरात तैनात करण्यात आला होता. या कारवाईसाठी प्रशासनाकडून सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. अखेर दोन जेसीबीच्या मदतीने हे बांधकाम पाडण्यात आले आहे.
माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

दरम्यान याप्रकरणी माहीम दर्गा ट्रस्टकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!